26.1 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ मग्रारोहयोच्या कुशल कामाचे देयक तत्काळ द्या

मग्रारोहयोच्या कुशल कामाचे देयक तत्काळ द्या

0
38

गोरेगाव,दि.30 : पंचायत समिती अंतर्गत २०१५ ते २०१८ पर्यंत झालेल्या मग्रारोहयोच्या अंतर्गत कुशल कामाचे देयक अजूनही मिळाले नाही. सदर देयक लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आ. विजय रहांगडाले यांना सरपंच सेवा संघाच्या वतीने देण्यात आले.
या वेळी दिलेल्या निवेदनातून २०१५ ते २०१८ या दरम्यान गोरेगाव तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींनी मग्रारोहयोचे कामे केली. यातील कुशल कामाचे देयक अजूनही देण्यात आले नाही. याची सरपंच सेवा संघाने दखल घेत थेट आमदाराला निवेदन देऊन सदर प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधले. यावेळी तेजेंद्र हरिणखेडे, सोमेश्वर रहांगडाले, उत्तम कटरे, योगेश चौधरी, जितू डोंगरे, उषा रहांगडाले उपस्थित होते. मग्रारोहयोच्या कुशल कामाच्या देयका संदर्भात जिल्हाधिकारी गोंदिया यांच्याशी पत्रव्यवहार करुन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन रहांगडाले यांनी दिले.तसेच लवकरच कुशल कामाचे देयक मंजूर करण्यात येईल, पाठपुरावा सुरु असल्याचे सांगितले.