एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

0
10

वर्धा,दि.03ः- जिल्ह्यातील देवळी येथे राज्यपरिवहन महामंडळाच्या बसच्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.सदर बस उमरखेड येथून पुसदला जात असताना हा अपघात झाला.देवळी येथील पेट्रोल पंप चौकात अपघात झाला. मृतकाची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलीस करीत असून मृतकाच्या बाईकचा क्रमांक MH32 AD 0547  आहे. यावरून ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलीस करीत आहे.