सर्पमित्र साईनाथ चौधरी व मित्रानी दिले ३ नागांना जीवदान

0
27

चंद्रपूर,दि.03 :  उन्हाळा सुरु झाला कि अनेकदा सापांचे दर्शन होते. नागरिक घाबर जातात. अशावेळी  परिसरातील सर्पमित्र लोकांच्या जीविताला हानी पोहचु नये म्हणून साप निघाल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी धाव घेत स्वतः;चा जीव धोक्यात घालत या सापांना पकडून जीवनदान देण्याचे कार्य करतात.  अनेक सर्पमित्र  सापाच्या रक्षनाकरिता पुढे येत त्यांना पकडून निसर्गाच्या सानिध्यात पुन्हा सोडण्याचे काम करतात.अशाच एक प्रकार चंद्रपूर शहरालगत असलेल्या पदमापूर येथील साईनाथ वाडगुरे यांच्या शेतात घडला. वाडगुरे यांच्या शेतातील कोरड्या पडलेल्या विहिरीत  तीन विषारी नाग असल्याचे त्यांनी पाहिले.आणि साईनाथ वाडगुरे यांनी या बाबत चंद्रपूर येथील सर्पमित्र  साईनाथ चौधरी यांना कळविले.त्यानंतर सर्पमित्राने पोचून विहिरीत उतरून एका नागाला पकडत वर काढले  तर दोन नाग  विहिरीतील अडगळीत गेल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा  सर्पमित्र साईनाथ चौधरी, यश सोनूले, सुरज मडावी, विक्रांत चांभारे, अजय यादव यांनी विहिरीत उतरून आतील  खड्याची तापासणी करीत दोन नाग  पकडत त्यांना बाहेर काढले. व या तिन्ही  सापांना मुक्त संचारासाठी  जंगलात सोडले.