नामनिर्देशनाच्या पहिल्याच दिवशी 18 पक्षांनी घेतले 44 अर्ज

0
7

11- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ पोट निवडणूक -2018
भंडारा, दि. 3 :  भंडारा – गोंदिया लोकसभा मतदार संघ पोट निवडणूकीच्या पहिल्याच दिवशी  18 पक्षांनी 44 नामनिर्देशन पत्र घेतले. नामनिदेशन पत्र सादर करण्याची अंतिम तारीख 10 मे, 2018 पर्यंत आहे. यामध्ये संजय गजनान केवट, एकलव्य समाज पार्टी-3, प्रकाश गणपतराव महालगाठे, भाजपा-3, विकास देवचंद मदनकर, भाजपा-2, चनीराम लक्ष्मण मेश्राम, शेतकरी कामगार पक्ष-4, श्यामराव मार्कंडराव कुकडे, अपक्ष-1, मजदूर रामविलास मस्करे, अपक्ष-2, अक्षय योगेश पांडे विदर्भ राज्य आघाडी-2, झिटु राघोजी दुधकुवर] बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी-1,   राकेश दसनलाल टेंभरे, ओबीसी समाज पार्टी-2, शेखर सुर्यभान गभणे अपक्ष-1,नितीन पुंडलिक तुमाने, अपक्ष-1, छैलबिहारी मातादिन अग्रवाल, विदर्भ राज्य आघाडी-2 व अपक्ष-2, विरेंद्र कस्तुरचंद जैस्वाल, भाजपा-2 व अपक्ष – 2, राजेश रामभाऊ बंसोड, अपक्ष-2 व राकॉपा-2, शंभु शरणसिंग ठाकूर बीजेपी-2,अपक्ष-2, सुरेश रामाजी भोवते एपीआय-1, रंजीत बाबुलाल चव्हाण, कॉग्रेस-2,राजेंद्र सहसराम पटले, शिवसेना-3 यांचा समावेश आहे.