भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण कक्ष

0
6

गोंदिया,दि.३ : भारत निवडणूक आयोगाने २६ एप्रिल २०१८ अन्वये ११ भंडारा-गोंदिया मतदारसंघ पोटनिवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. या निवडणूकी संदर्भातील तक्रार दाखल करण्याकरीता निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द झाल्यापासून म्हणजेच ३ मे २०१८ पासून ते २ जून २०१८ पर्यंत कक्ष क्रमांक १०२, जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे नियंत्रण कक्ष/तक्रार निवारण कक्ष प्रस्थापित करण्यात आले आहे. निवडणूकी संदर्भात कोणतीही तक्रार सादर करावयाची असल्यास ती नियंत्रण कक्षात प्रत्यक्ष किंवा दूरध्वनी क्रमांक ०७१८२-२३०१९६/२३६१४७ यावर सादर करावी. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिमन्यू काळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.