24.3 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ भाजपमुक्त जिल्ह्यासाठी काँग्रेस आघाडी करणार काम-सभापती अंबुले

भाजपमुक्त जिल्ह्यासाठी काँग्रेस आघाडी करणार काम-सभापती अंबुले

0
25

तिरोडा,दि.04ः-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या 28 मे रोजी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीकरीता तिरोडा तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने घेण्यात आलेल्या सभेत भंडारा-गोंदिया भाजपमुक्त करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी सयुंक्तरित्या काम करणार असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  ताकदीने कामाला लागावे असे विचार गोंदिया जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले यांनी व्यक्त केले. बैठकीला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पुरषोत्तम कटरे, महिला जिल्हा काँग्रेस अध्यक्षा उषा सहारे, महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे,तिरोडा तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष राधेलाल पटले,प्रदेश सदस्य़ डाॅ. योगेंद्र भगत यांच्यासह तिरोडा तालुका काँग्रेस कमेटीचे सर्वं पदाधिकारी,सदस्य आणि कार्यकर्ते उपस्तिथ होते.या निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा उमेदवार रिगंणात राहणार असून भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची माहिती लोकापर्यंत पोचवून एकनिष्ठेने काम करावे असेही अंबुले म्हणाले.