25.1 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ रिधोराजवळ उभ्या ट्रकला बसची धडक,2 जागीच ठार

रिधोराजवळ उभ्या ट्रकला बसची धडक,2 जागीच ठार

0
26

मालेगांव,- दि.7- रिधोरा जवळील जय महाराष्ट्र धाब्यावर उभ्या असलेल्या ट्रकला लक्झरी बसने धडक दिल्याची घटना आज सकाळी 5.30 वाजता दरम्यान घडली. लक्झरी बसवर आयशर ट्रक आदळून अपघात झाला.या अपघातात  ,2 जण जागीच ठार झाले तर ,21 जखमीना अकोला येथे तर 2 जणांना रुग्णवाहिकेने   नागपूरला हलविण्यात आले.ट्रक क्र .आर जे 26- जी ए 3609 हा जय महाराष्ट्र धाब्यावर उभा होता.त्यावर मुम्बई वरून  नागपूरला जाणाऱ्या सागर ट्रॅव्हलच्या बस (ए आर .-02 -6001) ने धडक दिली.त्यानंतर या लक्झरी बसला अकोला कडून येणाऱ्या  आयशर ट्रक (क्र .एम पी -68-जी -0168 ने) धडक दिल्याने अपघातात आयशरचा क्लीनर व लक्झरी बस मधील प्रवासी दिलीप जाधव ( वय 32 वर्षे  )रा खिर्डा ता.कारंजा यांचा जागीच मृत्यू झाला.

blank