30.7 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home विदर्भ अर्जुनी मोर नगराध्यक्षपदी काँग्रेसचे शहारे,उपाध्यक्षपदी राँकाच्या घाटबांधे

अर्जुनी मोर नगराध्यक्षपदी काँग्रेसचे शहारे,उपाध्यक्षपदी राँकाच्या घाटबांधे

0
31

अर्जुनी मोरगाव,दि.25(संतोष रोकडे)- अर्जुनी मोरगाव नगरपंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे किशोर शहारे अध्यक्षपदी तर राष्ट्रवादीच्या हेमलता घाटबांधे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.काँग्रेस राष्ट्रवादीने या निवडणुकीसाठी आघाडी केली होती.भारतीय जनता पक्षाचे विजय कापगते यांनी अध्यक्षपदासाठी दाखल केलेला अर्ज 24 मे रोजी मागे घेतला.त्यामुळे काँग्रेसचे किशोर शहारे यांची बिनविरोध निवड झाली.तर उफाध्यक्षपदासाठी एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसच्या हेमलता घाटबांधे यांचा अर्ज दाखल झाल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणुक अधिकारी व उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनोळे यांनी केली.यापुव्री मात्र काँग्रेस भाजपची युती नगरपरिषदेत होती.