शिरपूर कागजनगर-पुणे ही नवी गाडी लवकरच सुरू होणार

0
15

चंद्रपूर,दि.01ः-चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील रेल्वेशी निगडीत अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी २९ मे रोजी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेदरम्यान रेल्वे मंत्र्यांनी शिरपूर कागजनगर ते पुणे ही नवी गाडी सुरू करण्यास या बैठकीमध्ये अनुकुलता दर्शविली असल्याने या नव्या गाडीमुळे या क्षेत्रातील नागरिक, व्यवसायी तसेच विद्यार्थ्यांना फार मोठी सोय होणार आहे.
ना. हंसराज अहीर यांच्या मागणीनुसार मुकूटबन येथे रेल्वे मंत्र्यांनी हाल्ट स्टेशनला सुध्दा मान्यता दिली आहे. पिंपळखुटी येथे अंडरपास संदर्भातील प्रस्तावावर सुध्दा या बैठकीत चर्चा झाली. सदर प्रस्ताव प्रोसेसमध्ये असुन त्याबाबत सुध्दा लवकरच निर्णय घेतला जाईल असे रेल्वे मंत्र्यांनी मान्य केले.
बल्लारशाह स्थानकावर २४ डब्यांसाठी पीटलाईन विस्तारीकरण संबंधातील प्रस्ताव मान्यतेकरिता प्रस्तावित करण्यात आले असून त्यावर सुध्दा यथावकाश सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन रेल्वे मंत्र्यांनी ना.अहीर यांना या चर्चेदरम्यान दिले. रामेश्‍वरम-फैजाबाद या गाडीचा थांबा चंद्रपूर रेल्वेस्थानकावर सुरू राहील असेही ना. अहीर यांना रेल्वे मंत्र्यांनी आश्‍वस्त केले. चंद्रपूर व यवतमाळ जिल्हय़ात आणखी चार-पाच गाड्यांच्या थांब्याविषयी सुध्दा रेल्वे मंत्र्यांनी अनुकुलता दर्शविली असून याबाबतचा निर्णय लवकरच होईल, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.
मुजफ्फरपूर-गोंदिया या गाडीचा बल्लारशाह पयर्ंत विस्तार करण्याच्या मागणीची दखल घेत रेल्वे मंत्री गोयल यांनी सेवाग्रामचे वेळापत्राक तसेच आनंदवन व पुणे एक्सप्रेस सप्ताहातून तीन वेळा चालविण्यासाठी मागणीनुसार तपासणी करण्याचे आदेशही दिले आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या भेटीप्रसंगी रेल्वेशी संबंधित अन्य मागण्यांबाबतही रेल्वे मंत्र्यांशी विशेष चर्चा केली.