८ जून रोजी सडक/अर्जुनी येथे महिलांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना मेळावा

0
9

गोंदिया,दि.7 : महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया, जिल्हास्तरीय प्रधानमंत्री मुद्रा योजना समन्वय समिती आणि नियोजन विभाग यांच्या संयुक्त वतीने सडक/अर्जुनी तालुक्यातील माविमच्या बचतगटातील महिलांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन ८ जून रोजी सडक/अर्जुनी येथील तेजस्वीनी लॉन येथे सकाळी ११.३० वाजता करण्यात आले आहे.
मेळाव्याचे उदघाटन पालकमंत्री राजकुमार बडोले हे करतील. अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे हे असतील. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष देवचंद तरोणे, पं.स.सभापती गिरीधारी हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, जि.प.सदस्य शिला चव्हाण, गंगाधर परशुरामकर, रमेश चुऱ्हे, श्रीमती माधुरी पाथोडे, सरिता कापगते, पं.स.सदस्य सर्वश्री कविता रंगारी, मंजू डोंगरवार, सुधाकर पंधरे, प्रमिला भोयर, जयशिला जोशी, इंदू परशुरामकर, विलास शिवणकर, गीता टेंभरे, तहसिलदार विठ्ठल परळीकर, गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांची तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अग्रणी जिल्हा प्रबंधक दिलीप सिल्हारे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक बी.एम.शिवणकर, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर, रजनी रामटेके यांची उपस्थिती राहणार आहे.
या मेळाव्यात आधार लोकसंचालीत साधन केंद्र सडक/अर्जुनीची वार्षिक सर्वसाधारण सभा, गौण वनोपज खरेदी केंद्राचा शुभारंभ, प्रधानमंत्री मुद्रा योजना चित्ररथाचा शुभारंभ, प्रोजेक्ट आत्मसन्मानचा शुभारंभ, बँकांमार्फत मुद्रा योजनेअंतर्गत महिलांना कर्ज वितरण आणि उत्कृष्ट महिला बचतगटांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. तरी सडक/अर्जुनी तालुक्यातील बचतगटांच्या महिलांनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी केले आहे.