सिहोर्‍यात चार घरांना आग

0
12
वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुमसर,दि.10ः-सिहोरा येथील झेंडा चौकातील मेंढी मोहल्ल्यातील घरांना तसेच गायीच्या दोन गोठय़ांना अचानक आग लागल्याने घर आणि गुरांचे वैरण जळून खाक झाले. ही घटना शनिवारी (दि.९) पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. नागरिक व अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
मेंढा चौकात मेंढी मोहल्ला येथे दाट वस्ती असून घरे एकमेकांना लागून आहेत. यामुळे आगीचे लोण अन्य घरांपर्यंत पोहोचले. शनिवारी पहाटेच्या सुमारास घराला आग लागल्याचे कुंडलिक घटारे यांना दिसताच त्यांनी आरडाओरड केल्याने नागरिकांनी घराच्या दिशेने धाव घेतली. यावेळी भोलाराम तुरकर, कुंजीलाल तुरकर, राजू तुरकर यांच्या गुरांच्या गोठय़ाला तसेच दशरथ बिसने यांच्या घराच्या छपराला आग लागल्याने गुरांचे वैरण व बिजाईच्या धानाची पोती जळून खाक झाली. आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. या आगीत जवळपास ३ लाखांचे नुकसान झाले असून आग लागल्याचे कारण कळू शकले नाही.
नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे. यावेळी घटनास्थळाला जि. प. बांधकाम सभापती धनेंद्र तुरकर, सरपंच मधुकर अडमाचे, ग्रा. पं. सदस्य फिरोज खान पठाण, धरमदास बिसने, कृउबास संचालक सुभाष बोरकर, तलाठी व पदाधिकार्‍यांनी भेट दिली.