‘पुरी-इंदोरा-पुरी साप्ताहिक रेल्वेगाडीला गोंदियात थांबा द्या’

0
19

गोंदिया,दि.10 : नागपूर-रायपूर या रेल्वेमार्गावर महत्त्वाचे ठिकाण असलेल्या गोंदिया रेल्वेस्थानकावर पुरी-इंदोरा-पुरी या साप्ताहिक रेल्वेगाडीला थांबा देण्याची मागणी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य नानू मुदलियार यांनी केली आहे.
नागपूर-हावडा या रेल्वेमार्गावर नागपूरनंतर दीड तासाच्या अंतराने येणारे गोंदिया रेल्वेस्थानक महाराष्ट्रातील शेवटचे महत्त्वाचे रेल्वेस्थानक आहे. या रेल्वेस्थानकावरून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा असते. महत्वाच्या कामासाठी प्रवासी गोंदिया रेल्वेस्थानकाचा वापर करतात. महाराष्ट्र तसेच लगतच्या मध्यप्रदेशात या राज्यातील रेल्वे प्रवासी गोंदिया रेल्वेस्थानकाचाच वापर करतात. महत्वाचे म्हणजे गोंदिया-जबलपूर या रेल्वेमागार्चे ब्राडगेजचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्या मार्गावरील प्रवाशांना गोंदिया रेल्वेस्थानकाचा वापर करता येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी केंद्रिय मंत्री प्रफुल्ल पटेल आणि आमदार राजेंद्र जैन यांच्या अथ्क प्रयत्नाने अनेक महत्वाच्या जलदगती रेल्वेगाडया गोंदिया रेल्वेस्थानकावर थांबतात. परंतु, पुरी-इंदोरा-पुरी ही साप्ताहिक रेल्वे गाडी गोंदिया रेल्वेस्थानकावर थांबत नाही.