24.6 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home विदर्भ वाघाच्या हल्यात एक महिला ठार तर एक गंभीर जखमी

वाघाच्या हल्यात एक महिला ठार तर एक गंभीर जखमी

0
19

सिंदेवारी,दि.10: चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या नेरी उपवनक्षेत्रातील गोदोंडा बिटातील जंगल परीसरात कुड्याचे फुले वेचायला गेलेल्या महादवाडी येथील महिलेवर वाघाने हल्ला केल्याने एक महिला ठार तर एक जखमी झाल्याची घटना आज 10 जून रोजी सकाळी 10 च्या सुमारास घडली. शेतशिवार जंगल परिसरात कुड्याचे फुले वेचायला गेलेल्या महिलांवर दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने  हल्ला केला. यात चिमूर तालुक्यातील महादवाडी येथील देवागंना देविदास निकेसर (वय ३५)ही जागीच ठार झाली.तर सोबत असलेल्या पार्वता राघोजी लेनगुरे(वय ५०)गंभीर जखमी झाली आहे.घटना बघून सोबत गेलेली एक महिला घाबरल्याने बेशुद्ध झाली होती. गंभीर जखमी असलेल्या महिलेला चिमूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर वनविभागाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला.