23.9 C
Gondiā
Saturday, August 22, 2026
Home विदर्भ लाखनीत बुधवारला व्याख्यानाचे आयोजन

लाखनीत बुधवारला व्याख्यानाचे आयोजन

0
24
लाखनी,दि.18ः-राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, लाखनी द्वारे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्य २० जून २०१६ रोज बुधवारला  सायं ६ वाजता स्व ल्क्ष्मनराव भुरे स्मृति प्रित्यर्थ योगामुळे मानवी जीवनात होणारे बदल याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी उद्घाटक डॉ नरेश चारमोडे, अध्यक्षस्थानी एकनाथ बाजीराव हटवार तर प्रमुख वक्ते म्हणून सुनील भाग्यावानी आणि पवन भुरे प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. तरी विवेकानंद सभागृह येथे नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष छबीलाल राहंगडाले, कार्यवाह अजिंक्य भांडारकर, सहकार्यवाह गोवर्धन शेंडे, वाल्मिक लांजेवार,कोमलदादा गभने यांनी केले आहे.