वेगळ्या विदर्भासाठी 4 जुलैला नागपूर बंदची हाक

0
8

बुलडाणा  दि. १९ :: : विदर्भ राज्य आंदोलन समितीने वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी  नागपूर येथे 4 जुलैला होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचा निषेध करण्याचे आवाहन केले असून त्या दिवशी नागपूर बंद ठेवून सरकारचा निषेध केला जाणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.येत्या 21 जून  रोजी खामगाव येथील विश्राम गृहावर  सकाळी 11 वाजता बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकी करीता विदर्भ प्रेमींनी व वेगळ्या विदर्भाबाबत शंका कुशंका असणाऱ्यांनी निस्पक्ष भावनेने हजर राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष तथा राज्य कोअर कमिटी सदस्य कैलास फाटे खामगाव, ऍड सुरेश वानखडे मेहकर, संपर्क प्रमुख तेजराव पाटील मुंढे, समन्वयक दामोदरजी शर्मा मलकापूर, नामदेवराव जाधव बुलढाणा, रामेशसिंग चव्हाण खामगाव,  डिगंबर चिंचोले यांनी केले आहे.