झाड कोसळून सहा महिला जखमी

0
7

यवतमाळ,दि.23 : येथील पाच महिला शेतमजूर शेतात कामासाठी जात असताना रस्त्यालगतचे जीर्ण झालेले चिंचेचे झाड त्यांच्या अंगावर कोसळले. त्यात पाच महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना आज सोमवारी (दि. 23) सकाळी दहाच्या सुमारास येथील बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर झाली.या घटनेत जखमी झालेल्यामध्ये लक्ष्मी शिवाजी आलमे, संध्या संजय बिचेवार, सीमा नीलेश बीचेवार, रेणुका श्याम बिचेवार, मंगल परमेश्वर बिचेवार, सुरेखा रामेश्वर बिचेवार यांचा समावेश आहे. त्यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असून, तिला उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. इतर जखमींवर उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.झाड कोसळल्याची बातमी गावात समजताच गावचे पोलिस पाटील गजानन मुलंगे, मिलिंद धुळे, पंजाबराव भालेराव, अनिल कांबळे, नीलेश बोनसले यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना ताबडतोब रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था केली व विस्कळित झालेली वाहतूक पूर्ववत सुरू करून झाड हटविले.