पारशिवनी नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा,नगराध्यक्ष मात्र सेनेचा

0
8
मौदा,दि.24(प्रा.शैलेष रोशनखेडे)-नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी नगरपंचायतीकरीता झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहिर झाला असून 17 प्रभागापैकी 11 प्रभागात भाजप नगरसेवकांनी विजय मिळवित एकहाती झेंडा नगरपंचायतीचा ताब्यात घेतला.मात्र नगराध्यक्षाच्या निवडणुकीत भाजपला तिसर्या स्थानी राहावे लागले असून शिवसेनेच्या प्रतिभा कुंभलकर यांनी 2438 मेत घेत विजय मिळविला.तर काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती डोमकी या 2229 मते घेऊन दुसर्या क्रमांकावर राहिल्या.नगरपंचायतीच्या १७ पैकी ११ जागांवर भाजप,४ जागांवर शिवसेना तर केवळ २ जागांवर यापुर्वी गड असलेल्या काँग्रेसला समाधान मानावे लागले.अध्यक्ष पदाकरीता प्रथम क्रमांकावर  शिवसेनेच्या  सौ.प्रतिभा कुंभलकर यांना २४३८ मते मिळाली. काँग्रेसच्या सौ.डोमकी यांना २२२९ मते तर भाजपच्या सौ. माधुरी बावनकुळे यांना १७८५ मते मिळाली.काँग्रेस बंडखोर रूबीना यांना ५५८ मते मिळाली.
भाजप अध्यक्ष पदाचा उमेदवार तिस~या क्रमांकावर राहिल्याने आमदार रेड्डी नाखुश झाले.भाजपचे ११ सदस्य जे बहूमताने निवडून आले त्याचे संपुर्ण श्रेय भाजपच्या स्थानिक पदाधीकार्यांना मिळाले. अध्यक्ष पदावर शिवसेनेने विजय मिळवित 4 जागा जिंकल्याने पुन्हा एकदा माजी आमदार अँड.आशिष जायस्वाल सक्रिय झाल्याचे चिन्ह बघावयास मिळाले.