भाजपा प्रशिक्षण सेल जिल्हा संयोजक पदी दीपक कदम

0
23

गोंदिया,दि.27ः- गोंदिया जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी पक्षाच्यावतीने अभियान राबविण्यात आले असून या प्रशिक्षणाच्या जिल्हा सयोंजकपदी माजी नगरसेवक दिपक कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.कदम यांची नियुक्ती  भाजप जिल्हा अध्यक्ष हेमंतभाऊ पटले,विदर्भ संघटन मंत्री डाॅ उपेन्द्र कोठेकर व प्रशिक्षण प्रभारी विदर्भ श्रीकांत देशपांडे यांनी केली आहे.हे प्रशिक्षण कार्यक्रम विधानसभा मतदारसंघनिहाय घेण्यात येणार असल्याचे विधानसभा सयोंजकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे.त्यामध्ये गोंदीया विधानसभा मतदारसंघ राजेश चतूर,अर्जुनी मोर विधानसभा मतदारसंघ सयोंजकपदी सभापती अरविंद शिवणकर,आमगाव विधानसभा मतदारसंघ सयोंजकपदी- काशीराम हूकरे तर  तिरोडा विधानसभा सयोंजकपदी माजी तिरोडा तालुकाध्यक्ष डाॅ वसंत भगत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.