सावित्रीबाई फुले फालोअर्स महिला संगठनेतर्फे वृक्षारोपण

0
10

गोंदिया,दि.30: शासनाच्या १३ कोटी वृष लागवडीची संकल्पना पूर्ण करण्याच्या दृष्टीने सावित्रीबाई फुले फालोअर्स महिला संगठन गोंदिया यांचेतर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी संबंधित संगठन सदस्यांनी लुंबिनी बौद्ध विहार कुडवा, कटंगी, नवचैतन्य बौद्ध विहार खापर्डे कॉलनी, पूनाटोली कब्रस्तानामध्ये विविध वृक्षांच्या रोपट्यांची लाागवड केली. यात प्रामुख्याने qपपळ, वड, आम्रवृक्ष, आवळा, कदम, पेरु, पपई, शेवगा, कडूqनब, कुडग या रोपट्यांची लागवड करण्यात आली. संवर्धनासाठी परिसरातील महिला, पुरुष व बच्चे कंपनीनेही सहकार्य केले. तसेच संगठनाकडून रोपट्यांना ट्री गार्ड ही लावण्यात आले असून प्रत्येक रोपट्याची स्थानिक कुटुंबांनी प्रति कुटुंब दोन रोपटे संवर्धन करण्याची जवाबदारी स्विकारली आहे. तसेच रोपट्यांची लागवड केलेल्या परिसरात सावित्रीबाई फुले फालोअर्सच्या सदस्यांनी आठवड्यात एकदा भेट देण्याची तयारी दर्शविली.
या वृक्षारोपणाच्यावेळी सावित्रीबाई फुले फालोअर्स महिला संगठन गोंदियाच्या सुनीता आगलावे, डॉ. शिल्पा मेश्राम, ज्योती डोंगरे, अ‍ॅड. प्रज्ञा डोंगरे, निरंजना qचचखेडे, अ‍ॅड. एकता गणविर, स्मिता गणवीर, सविता उक़े, वाणी लांजेवार, गौतम, प्रेरणा रामटेके, उमा गजभिये, हर्षा वैद्य, वंदना मडामे, उत्तमा गोंडाणे, कुंदा गडकिनी, वैशाली खोब्रागडे, पिंकी गणवीर व परिसरातील महिला-पुरुष यांनी सहभाग घेतला.