अर्जुनी/मोर. येथे संविधान बचाव रॅली उद्या

0
9

अर्जुनी/मोरगाव ,दि.31ः-दिल्ली येथील जंतर मंतर मैदानात ९ ऑगस्ट रोजी भारतीय संविधानाच्या प्रत पोलिसांसमोर जाळून संविधान विरोधी घोषणा दिल्या. हे कृत्य भारतातील न्यायव्यवस्थेचाच नव्हे तर सर्व भारतवासीयांचा अपमान करणारे राष्टद्रोह कृत्य असून या कृत्याचा निषेध करण्यासाठी अर्जुनी मरोगाव तालुक्यातील सर्व परिवर्तनवादी समानतावादी संघटनेच्या वतीने १ सप्टेंबर २0१८ ला संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
संविधान बचाव रॅलीची सुरुवात १ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता दुर्गा चौक अर्जुनी मोरगाव येथून निघणार आहे. या रॅलीमध्ये अखिल भारतीय बौद्ध महासभा, ओबीसी संघर्ष कृती समिती, ऑल इंडिया आदिवासी पिपल्स, वुमन स्टुंडट फेडरेशन, क्रांतीवीर बिरसा मुंडा समिती, कुणबी समाज कृती समिती, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड संघटना, समता सैनिक दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सेंटर फॉर जस्टीज अँड फिस, तालुका पत्रकार संघ, भीम टायगर्स युवा संघटना, लेती समाज संघटना, भोई समाज संघटना, बिंजवार समाज संघटना, युगपुरुष युवा मंच, एकता मंच अर्जुनी मोरगाव या परिवर्तनवादी व समानतावादी संघटनांचा समावेश राहणार आहे. या रॅलीमध्ये तालुक्यातील सर्व बहुजन मागासवर्गीय संघटनेच्या सदस्यांनी हजारोच्या संख्येनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.