29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ ग्यारापत्ती जंगल परिसरात पोलिस-नक्षल चकमक

ग्यारापत्ती जंगल परिसरात पोलिस-नक्षल चकमक

0
26

गडचिरोली ,दि.05ः-कोरची तालुक्यातील ग्यारापत्ती पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत सी-६0 जवान आज ४ सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजताच्या सुमारास नक्षलविरोधी अभियान राबवित असताना पोलिस-नक्षल चकमक उडाली. मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नसून सी-६0 जवानांनी घटनास्थळावरून मोठय़ा प्रमाणात नक्षल साहित्य जप्त केले आहे.
प्राप्त माहितीनुसार आज सी-६0 जवान ग्यारापत्ती पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत नक्षलविरोधी अभियान राबवित होते. दरम्यान जंगला दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेन गोळीबार केला. पोलिसांनी आत्मसंरक्षणार्थ नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षली घटनास्ळावरून पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळावर रायफल, वॉकीटॉकी, मेडीसीन, दैनंदिन वापराचे सहित्य, नक्षली गणवेश व अन्य साहित्य जप्त केले. सदर जंगल परिसरात नक्षविरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे.