शास्त्री वॉर्डात प्रथमच दहीहंडी हर्षोल्हासात 

0
14
गोंदिया : दि 9- शास्त्री वॉर्ड येथे यशोदा सभागृहासमोर नगरसेवक सुनिल तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच दहीहंडी कार्यक्रम साजरा करण्यात आला. विजेत्या गोविंदांच्या पथकाला पारितोषीक देवून सन्मानीत करण्यात आले. शास्त्री वॉर्ड गोंदिया येथे गेल्या काही वर्षांपासून नगरसेवक सुनिल तिवारी यांनी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम घेणे सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षीपासून त्यांनी बाळगोपाळांकरिता दहीहंडी कार्यक्रम सुरू केला. शनिवारी सायंकाळी महिला आणि वॉर्डातील मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी बाळगोपाळांनी डीजेच्या तालावर ठेका धरला. रात्री नऊच्या सुमारास येथीलच तरुणांच्या गोविंदा पथकाने चार थर रचून दहीहंडी फोडली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला आणि पुरूष सुरू होते. प्रसाद वितरीत करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन अथर्व तिवारी, अफजल पठाण, परेश शिवहरे, शानू शेट्टीवार आदींनी केले. आयोजनाकरिता मोनू सोनकुसरे, अकरम पठाण, राजकुमार क्षिरसागर, सतीश वंजारी, रोहित कटरे, अंकीत मेंढे, प्रदीप चचाने, चंदन माणकपुरी, आशिष चव्हाण, बादल रहांगडाले, उद्देश रहांगडाले, सुजल चतुर्वेदी, जिजो वर्गीस, जयदीप यादव, निखील यादव, आफताब सय्यद, दानू योदव, आकाश मेश्राम, विकेश मेश्राम, राज यादव, संदीप पाटील, निहाल क्षिरसागर, शुभम दिघोरे, अनिरुद्ध जायस्वाल आदींनी सहकार्य केले.