वीज वाहिन्यांखाली , ठराविक अंतरावर घराचे बांधकाम नकोच

0
37

गोंदिया,दि. २८:-घरावरून गेलेल्या वीज वाहिन्यांना स्पर्श होउन तसेच घराच्या अगदी जवळून जानाऱ्या वीज वाहक तारेला स्पर्श होउन अनेकांचा जीव गेल्याचे घटना यापूरर्वी  घडल्या आहेत या अपघातात झालेले नुकसान न भरून निघणारे आहेत. त्यामुळे वीजेचा अपघात  टाळण्यासाठी  इतर सुरक्षिततेच्या घर किंवा कोणत्याही प्रकारचे बांधकाम करायला नको, असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे .

विजेच्या पुढे क्षमा नाही हे माहित असतानाही काही ठिकाणी उच्‍चदाब वीज वाहिन्यांखाली सर्रासपने बांधकाम झालेले आणि होत असल्याचे दिसून येते. तसेच अनेक ठिकाणी बान्ध्कां करताना हेतुपुरस्सरपणे वीज नियमाचे पूर्णपणे उल्ल्घन् होत असल्याचे दिसून येते. वीज वाहिन्यांचा ढोका लक्षात घेता त्यांच्याखाली बांधकामाची परवानगी देऊ नये . अशी कायद्यात तरतूद आहे . मात्र असे असताना अनेक ठिकाणी बांधकाम करण्यात आले आहे  आणि सर्रास सुरु आहे . तसेच शहराचा तसेच गावांचाही विस्तार सुरु असल्याने लोकवस्ती दूरवर पसरली आहे . पण बांधकामाची परवानगी देण्यापूर्वी त्याची तपासणी करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची आहे. तसेच नियमाचे उल्लंघन झाले, असे आढळल्यास असे बांधकाम पडण्याची तरतूद वीज कायद्यात आहे. नियमातील तरतुदीप्रमाणे बांधकाम करताना वीज वाहिन्यांपासून अंतर ठेऊनच बांधकाम करायला पाहिजे. जेणेकरून अपघात होणार नाही मात्र नियमबाह्य आढळल्यास महावितरणकडून अशा ठिकाणी कारवाई होईल तसेच हे बांधकाम पाडण्यासाठी महावितरण संबंधित यंत्रणेकडे महापालिका किंवा ग्रामपंचायतकडे प्रस्ताव पाठवू शकते, अशी तरतूद आहे मात्र प्रत्येकाने सुरक्षेसाठी या बाबींचा अंमल करावा.

 ट्रान्सफॉर्मर, फिडर फिलर किंवा खांबावर शॉर्टसर्किट झाल्यावर त्याठिकाणी नागरिकांनी जाऊ नये, लागलीच महावितरणला कळवावे. शहरातील सोसायट्या वस्ती भागात वायर, तारा उघड्या नसतील याची खाञी  करून घ्यावी. नागरिकांच्या सहकार्यामुळेच भविष्यात उदभवणारी दुर्घटना टळू शकते. त्यामूळे नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे. शहरी व ग्रामीण भागातील मध्य़वर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १८००- २००-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही महावितरणने केले आहे.

अशी घ्यावी काळजी- वीज उपकरणांना पाणी लागु देउ नका, वीज उपकरणे ओलाव्यापासुन दूर ठेवा, लेाखंडी तारेवर कपडे वाळत घालू नका. ओल्या कपडयांवर इस्ञी फिरवू नका, बांधकाम करतांना वीजेच्या तारांना स्पर्ष होणार नाही, याबाबत दक्ष राहणे आवश्य़क आहे