तेलगंणाच्या रेती कंत्राटदाराने साठविला अवैध साठा,रामजापूर ग्रा.प.ने दिले जिल्हाधिकाèयांना निवेदन

0
9

सिरोंचा,दि.२८(अशोक दुर्गम)ः- ग्रामपंचायतची परवानगी न घेताच तेलगांणा राज्यातील करीमनगर येथील रेती कंत्राटदाराने रेतासाठा अवैधरित्या केल्याने रस्त्याची व पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असल्याने जिल्हा प्रशासनाने रेतीसाठा व रेतीची वाहतुक तत्काळ थांबवावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वार ग्रामपचांयत रामजापूर वे.ल.च्यावतीने देण्यात आले आहे.सविस्तर असे की ग्रामपंचायत रामजापूर अंतर्गत qचतलपल्ली येथील सर्वे क्रमांक ४१२,४९५ मध्ये कंत्राटदार नागमल्ला महेंदर एैंबन्ना रा.मंथीनी जिल्हा करीमनगर(तेलगणा) यांनी अवैधरित्या रेती साठा करुन ठेवला आहे.त्याठिकाणी दररोज ३०० ते ५०० ट्रक त्या रेतीची वाहतुक करण्याकरीता रस्त्याच्या कडेला उभे असतात.जेव्हा की कुठलीही पार्किंग परवानगी घेण्यात आलेली नाही तसेच रेती साठवूण ठेवण्याची सुध्दा परवानगी घेण्यात आलेली नाही.या ट्रकमुळे व रेतीमुळे रस्त्याने ये जा करणारे शेतकरी,विद्यार्थी व नागरिकांच्या डोळ्यात रेती जाऊन आजारी होत असल्याचे प्रमाण वाढले आहे.सिरोचा येथील तहसिलदारांना निवेदनाद्वारे २५ सप्टेंबरला माहिती देऊनही कारवाई न झाल्याने ग्रामपंचायत आपल्याकडे न्याय मागत असल्याचे निवेदनात सरपंत कु,सरिता नर्सया तालापेली,उपसरपंत रवि राजन्ना संतोषपू व सचिव डी.ए.वायबसे यांनी केली आहे.