सरदार पटेलांनी भारताला एकतेच्या सूत्रात बांधले : रमेश कुथे

0
12
गोंदिया,दि.0१ः- सरदार वल्लभभाई पटेल हे खèया अर्थाने लोहपुरुष होते. त्यांनी स्वातंत्र्यानंतर देशाला एका सुत्रात बांधण्यासाठी  जम्मू काश्मीरसह ५६५ संस्थांचे विलीनिकरणाचे महत्वाचे कार्य केले. आज वल्लभभाई पटेलांची १८२ मीटर उंचीच्या जगातल्या सर्वात मोठ्या प्रतिमेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  ३१ ऑक्टोबर रोजी लोकार्पण करुन खरी आदरांजली दिली जात आहे. तर त्यांच्या १४३ व्या जयंतीदिनानिमित्त आयोजित ङ्करन फॉर युनिटीङ्क एकात्मता दौडमधून मिळणारा एकतेचा संदेश देशाला अधिक बलशाली करणारा ठरणार आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रमेश कुथे यांनी केले.
ते भारतीय युवा मोर्चा शहर तर्फे बुधवारी, ३१ ऑक्टोबर रोजी राजलक्ष्मी चौकात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एकात्मता दौडच्या समापन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रामुख्याने भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी आमदार हरिहरभाई पटेल, नप उपाध्यक्ष शिव शर्मा, जिप सभापती शैलजा सोनवाने, नगरसेवक भरत क्षत्रिय, राजकुमार कुथे, ज्येष्ठ धावक मुन्नालाल यादव, संजय कुलकर्णी, भाजयुमो शहर अध्यक्ष नेत्रदीप (गोल्डी) गावंडे आदी उपस्थित होते.  मनोहर चौक येथील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपासून त्याची सुरुवात जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी हिरवी झेंडी दाखवून केली. या दौडमध्ये शेकडोच्या संख्येत युवक-युवती, विद्याथ्र्यांनी सहभाग नोंदविला. विजयी स्पर्धकांमध्ये पुरुष गटात प्रथम पुरस्कार सुभाष दिनाजी लिल्हारे, द्वितीय सशील दिलीप रहांगडाले व तृतीय आशिष दुर्गाप्रसाद नागपुरे यांचा समावेश आहे तर महिला गटात प्रथम पुरस्कार अलका मानधारे, लक्ष्मी ठाकरे द्वितीय व तृतीय पुरस्कार शिल्पा भिमटे यांना देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन दीपक कदम यांनी तर आभार गोल्डी गावंडे यांनी मानले. या वेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.