केसलवाडा येथे पोलिस चौकीचे उद््घाटन

0
7

लाखनी, दि.५ ; तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील केसलवाडा पवार या गावात पोलिस चौकीचे उद््घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला आ. बाळा काशीवार, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम साळी, तहसीलदार मलिक विराणी, सरपंच अनिल नंदेश्‍वर, मोरेश्‍वर पटले, कांबळे, नूतन पवार आदी उपस्थित होते.
कोका जंगलाचा हा भाग असून काही प्रमाणात नक्षल भाग आहे. आजपयर्ंत एकही पालकमंत्री या गावाने पहिला नाही. या गावात येणारे ना. बावनकुळे हे पहिलेच पालकमंत्री आहेत.
नागरिकांच्या जीवाचे रक्षण करणे, मालमत्तेचे रक्षण करणे ही आमची पहिली जबाबदारी आहे. पोलिस मित्र बना. एका गावातून ५ तरुण पोलिस मित्र बना. पोलिसांना मदत करा. जुन्या काळात पोलिस लागतच नव्हते. समाजमन चांगले असले की पोलिसांची गरज पडत नाही. पोलिसही शेवटी माणूस आहे, याचा विचार केला पाहिजे. या चौकीच्या बांधकामासाठी २५ लाख रुपये देण्याची घोषणा ना. बावनकुळे यांनी केली.