तीन वाघ, डझनभर बिबटे ठार करवूनही अजून मंत्रिपदी कसे? : मनेका गांधी

0
13
नागपूर(विशेष प्रतिनिधी)दि.05 – यवतमाळ जिल्ह्यातील टी वन उर्फ अवनी या कथित नरभक्षक वाघीणीला ठार मारल्यामुळे भाजपच्या नेत्या, केंद्रीयमंत्री मनेका गांधी प्रचंड संतापल्या आहेत. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर त्यांनी आपला राग काढला असून त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करणारे निवेदन त्यांनी प्रसिद्धीला दिले आहे. अवनीसह तीन वाघ, डझनभर बिबटे आणि ३०० रानडुकरांना या मंत्र्यांच्याच आदेशान्वये ठार मारण्यात आले असून असा माणूस अजून मंत्रिपदी कसा राहू शकतो, असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, मुनगंटीवार यांच्या खात्याचे नाव अवैध शिकारी मंत्री असे ठेवले पाहिजे, असे ट्वीट युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले.अवनीला ठार करण्यात आल्याची बातमी आल्यानंतर वन्यप्राणी प्रेमी मनेका गांधी यांचा तीळपापड झाला आहे. त्या अनुशंगाने त्यांचे एक निवेदन माध्यमांकडे आले असून त्यात त्यांनी मुनगंटीवार यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. वन खात्याच्या अधिकाऱ्यांचा आणि जनभरातील वन्यप्राणी प्रेमींचा विरोध असतानाही वनमंत्री मुनगंटीवार यांनी या वाघीणीला मारण्याचे निर्देश दिले. हे एक मजबूत गुन्हेगारीचे प्रकरण आहे, असेही मनेका गांधी यंानी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.