सडक अर्जुनी,दि.5 –़डुग्गीपार पोलीस ठाणेंतर्गत सौंदडजवळील राका मार्गावर रविवारच्या रात्री 8.30 वाजेच्या सुमारास रेल्वे गेट जवळ एका पिशवीमध्ये मृत अवस्थेतील अर्भक आढळल्याची घटना उघडकीस आली आहे.पोलीसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. आंबेडकर वॉर्ड क्र. 5 येथील राका मार्गावरील सौन्दड रेल्वे फाटक जवळील परिसरात एका पिशवीमध्ये काही तरी असल्याची शंका नागरिकांना येताच बघण्यासाठी गेले असता मृतावस्थेत अर्भक आढळून आले. 6 ते 7 महिन्याचे अर्भक असावे अशी शंका आहे.





