विदर्भ बहुजन क्रांती मोर्चाचे जेलभरो आंदोलन November 5, 2018 023 FacebookXPinterestWhatsAppTelegram गोंदिया/वाशिम,दि.05 – राष्ट्रीय बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली बहुजन क्रांती मोर्चाच्या वाशिम युनिटतर्फे जेलभरो आंदोलन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी केंद्र व गुजरात सरकारच्या निषेधार्थ सभा घेतली. त्यानंतर संवैधानिक शांततेने स्वतःला अटक करून घेत जेलभरो आंदोलन केले.तर गोंदिया येथील आंबेडकर चौकात निदर्शन करण्यात आली,त्यानंतर पोलीस निरिक्षकांना निवेदन सादर करण्यात आले.संविधानाने देशातील नागरिकांना अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र, केंद्र व भाजपशासित राज्य सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत आहे, असा आरोप मोर्चातर्फे केला आहे. त्या विरोधात आंदोलन केल्याचे मेश्राम यांनी सांगितले.