गणखैरा येथे नाट्यप्रयोगादरम्यान मान्यवरांचा सत्कार

0
12

गोरेगाव,दि.12ः- तालुक्यातील गणखैरा येथे परिवर्तन युवा मंच द्वारे आयोजीत संगीत ” पुत्र विकला कुंकवासाठी ” या नाट्य प्रयोगाचे उदघाटन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडालेंच्या हस्ते भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंतभाऊ पटलेंच्या अध्यक्षतेखाली पार पडले.दिपप्रज्वलन माजी सभापती मोरेश्वर कटरे यांनी केले.यावेळी बँक संचालक रेखलाल टेंभरे , जि.प.सदस्या रोहीनीताई वरखडे ,सरपंच धाराताई तुप्पट, पं.स.सदस्य पुष्पराज जनबंधु , डा.के.टी.कटरे,एम.टी.दानी, सरपंच राजेश कटरे , निरज संगतानी , सरपंच वैशाली तुरकर , माजी सरपंच रमेश ठाकुर, माजी सरपंच जगदिश बोपचे,माजी सरपंच खुन्नीभाऊ पारधी,माजी सरपंच जयमाला जांभुळकर, सूरजलाल कांबळे , भुमेश पारधी,चमन पारधी,आदि मान्यवर उपस्थीत होते. यावेळी माजी सैनिक सुभाष कापसे, लक्ष्मीचंद आदमने , जयदेव चौधरी,गोपीचंद दाणी, मार्कंडराव मौदेकर, हिरालाल दाणी, सेवानिवृत्त पोलीस शामराव दाणी, सेवानिवु्त्त शिक्षक आर.एल.शहारे, नरेन्द्र रहांगडाले, चंद्रीकापुरे मॅडम, कपूरचंद मौदेकर ,प्राविण्यप्राप्त विद्यार्थी प्रा.डा.विजय रैवतकर , नितेश बन्सोड ,शितल राऊत यांचा सत्कार करण्यात आला.