सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून समाजकार्याचे एक पाऊल पुढे -आ.अग्रवाल

0
21

विवाह सोहळ्याचे दरवर्षी आयोजन करणार

गोंदिया दि.१६ :: ख्वाजा गरीब नवाज अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्थेने सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून समाजकार्याचे एक पाऊल पुढे टाकले आहे. युवकांनीदेखील यात सक्रियपणे सहभाग घेऊन कार्य केले, ही बाब खरोखरच प्रशंसनीय आहे. मागील काही वर्षांपासून मुस्लीम समाज सामूहिक विवाह सोहळा आणि शादीखान्याच्या नावावर मुस्लीम समाजावर काहीजण टीका करीत आहे. मात्र संस्थेने याकडे लक्ष न देता या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून समाजाच्या पलीकडे जाऊन कार्य केले. त्यामुळे मुस्लीम समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे दरवर्षी आयोजन करण्याची ग्वाही आ. गोपालदास अग्रवाल यांनी दिली..

या ख्वाजा गरीब नवाज अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्थेतर्फे स्थानिक सर्कस मैदानावर मुस्लीम समाजाचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी समाजबांधवांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.या वेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, मनोहरभाई पटेल ॲकॅडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल, हाजी अमीन गोडील, अमीन कंडुरेवाला, असलमभाई गोडील, हाजी हनीफभाई, रफीक कुरैशी, जुनैदभाई, हाजी कुतुबुद्दीन सोलंकी, हाजी जब्बार भाई, खालीद पठाण, शकील मन्सुरी, अशफाकभाई, साबीर पठाण, सुल्ताना तिगाला, जहीर अहमद, महफुजभाई, हाजी अशफाक अहमद, सगीर अहमद, यासीन तिगाला, हाजी अबरार सिद्दीकी, हाजी जलील सोलंकी, हाजी गुलाम, कदीर खान, रिजवान वैद्य, अख्तर अल्ली, सरफराज अमीन गोडील, रियाज रज्जाक कच्छी, फिरोज पोठीयावाला, ईलीयास फांडन, ओवेश पोठीयावाला, फिरोज कच्छी, गुलाम हसन लोहीया, रेहान फारून कंडरेवाला, इमरान असलम गोडील, असलमभाई मिस्त्री, ईरशाद कंडुरेवाला, जावेद रजा उपस्थित होते..

अग्रवाल म्हणाले, कितीही अडचणी आल्या तरी गोंविदपूर येथे शादीखाना तयार करण्यात येणार आहे. यासाठी काँग्रेस सरकारच्या काळात ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यापैकी पहिल्या टप्प्यातील तीन कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झाला आहे. विविध अडचणी आणून शादीखान्याच्या बांधकामाला खोडा निर्माण करण्यात आला होता. मात्र लवकरच शादीखान्याचे बांधकाम पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही अग्रवाल यांनी दिली.वर्षा पटेल व खा. प्रफुल्ल पटेल या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र काही महत्त्वाच्या कामामुळे ते उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी या विवाह सोहळ्याला शुभेच्छा दिल्या असून मुस्लीम समाजबांधवांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. माजी मंत्री नबाब सिद्दीकी यांनी सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या सर्व नवयुगुलांना शुभेच्छा दिल्या. मुस्लीम समाजबांधवांनी सामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले..

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सामूहिक विवाह सोहळ्यामुळे खर्चाची बचत होते शिवाय समाजात एकोपा निर्माण करण्यास मदत होते. मी माझ्या मुलाचा विवाह सामूहिक विवाह सोहळ्यात केल्याचे सांगितले. विकास आणि रोजगाराचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने एकाही आश्वासनाची पूर्तता केली. केवळ दिशाभूल करण्याचे काम केले. समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सत्तारूढ सरकार करीत असून अशा सरकारपासून सावध राहण्याचे आवाहन केले..

प्रास्तविकातून संस्थेचे अध्यक्ष सरफराज गोडील यांनी समाजातील युवकांनी लोकहिताचे कार्य करण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले.आ.अग्रवाल यांच्या सहकार्यामुळे हे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात मदत होत असल्याचे सांगितले. गोंदिया शहरात कधीच जातीय तेढ निर्माण झाला नाही, सर्वजण गुण्यागोविंदाने राहत असल्याचे सांगितले. मुस्लीम समाजाला शादीखाना बांधकामासाठी शासकीय दराने जागा उपलपब्ध करून देण्याची मागणी केली. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा काँग्रेस महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी केले. यशस्वितेसाठी संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले..