मुख्यमंत्री चषकाने ग्रामीण भागातील खेळाडूना राज्यस्तरावर चमकण्याची संधी- विनोद अग्रवाल

0
11

गोंदिया,दि.१६ ::आगामी मुख्यमंत्री चषक कार्यक्रमाचे नियोजन आणि आढावा घेण्यासाठी स्थानिक अग्रसेन भवन येथे भारतीय जनता पक्ष तसेच सर्व अंगीकृत संघटनांची बैठक पार पडली.यावेळी प्रामुख्याने भाजप प्रदेश उपाध्यक्ष रमेश कुथे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेतराम कटरे, शहराध्यक्ष सुनील केलनका, भाऊराव उके, भाऊराम मेश्राम, राजनीताई नागपुरे, राजकुमार कुथे, गटनेता घनश्याम पानतवने ,भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले उपस्थित होते.
दि. २० नोव्हेंबर २०१८ ते २ डिसेंबर २०१८ पर्यंत गोंदिया विधानसभेतील ४ झोन मधे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यात आयुष्यमान भारत क्रिकेट स्पर्धा, जलयुक्त शिवार व्हॉलीबॉल, उडाण १०० मी. रेस, सौभाग्य खो-खो, शेतकरी सन्मान कबड्डी, अटल मॅरेथॉन, मुद्रा योजना ४०० मी. रेस, कौशल भारत कॅरम, उजाला गायन स्पर्धा, उज्ज्वला नृत्य स्पर्धा, इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धा, मेक इन इंडिया रांगोळी अशा विविध १२ प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. गोंदिया, कामठा, नागरा आणि काटी या चार झोन मधे या स्पर्धा घेण्यात येणार असून प्रत्येक झोनच्या विजेत्यांचे फायनल गोंदिया येथे घेण्यात येणार आहे. आणि यात विजेते ठरलेल्याना राज्यस्तरावर चमकण्याची संधी मिळणार आहे.ज्यांनी वयाची १६ वर्षे पूर्ण केलेली आहे त्यावरील युवक आणि युवती यांना ुुु.लालहरीहरज्ञ.लो या संकेतस्थळावर करता येईल किंवा ७८७८७८५०५० या क्रमांकावर मिसकॉल देऊन आलेल्या लिंक वर फॉर्म भरून नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणी पूर्ण पणे निशुल्क असून एका पेक्षा अधिक खेळांत आपण भाग घेता येणार आहे आणि प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र नोंदणी करणे आवश्यक ठेवण्यात आलेले आहे.यावेळी भारतीय जनता पक्षाचे तसेच भारतीय जनता युवा मोर्चा आणि सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.