30.1 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ बोरमाळा नदीघाटावरून अवैध नियमबाह्य रेती वाहतूक

बोरमाळा नदीघाटावरून अवैध नियमबाह्य रेती वाहतूक

0
23

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अडविले रेतीचे ट्रक

सावली,दि.21ः-सावली तालुक्यातील सुरू असलेले बोरमाळा येथिल रेतीघाटावरून अवैध रीत्या नियमबाह्य रेतीची वाहतूक गेल्या कित्येक दिवसापासून सुरु असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत होते त्यामुळे आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास सावली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर अवैध रेतीचे पाच ट्रक अडवून धरले रेती वाहतूक परवाना चार ब्रास चा अस्तताना वास्तविकतेत प्रत्येक हायवा ट्रक मध्ये पाच ब्रास पेक्षा जास्त रेती वाहतूक होत असल्याचे दिसून आले यामुळे शासनाची दिशाभूल होत असून महसूल बुडत आहे .सदर ट्रक अडवून धरून तालुका प्रशासनाला कळविण्यात आले परंतु 12 वाजता पासून 4 तास लोटल्यांतर 4 वाजता नायब तहसिलदार चिडे साहेब घटनास्थळी पोहोचले यावरून प्रशासन रेती माफियांना पाठीशी घालत असल्याने दिसून येते . नायब तहसिलदार चिडे यांनी सदर ट्रक पोलीस स्टेशन पाथरी येते जमा करण्यात येवून पंचनामा करून योग्य कार्यवाही करण्याचे यावेळी सांगितले
सदर नियमबाह्य रेती वाहतूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सावली तालुकाध्यक्ष अनिल (मुन्ना)स्वामी ,माजी जि प सदस्य यशवंत ताडाम, माजी प स उपसभापती मनोहर ठाकरे, ईश्वर नवघडे, किशोर मलोडे, लीलाधर चौधरी, संतोष लाडे, वामन भोपये, सिध्दांत लाडे यांनी अडवून धरली.