तिरोड्याचे ठाणेदार कोळी निलंबीत 

0
8
अवैध धंद्यांना आळा न बसल्याने निलंबीत झाल्याची चर्चा
गोंदिया,दि.21: तिरोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना निलंबीत केल्याचे आदेश तिरोडा पोलीस स्टेशनला धडकल्याने तिरोडा पोलीस स्टेशन अधिकारी, कर्मचाºयांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून आणखीही काही कर्मचाºयांचे निलंबन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून यामुळे तालुक्यात सर्वत्र हा चर्चेचा विषय झाला आहे.
२० नोव्हेंबरला सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयातून आलेल्या बंद लिफाफ्यात तिरोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप कोळी यांना निलंबीत केल्याचे आदेश असल्याचे चर्चेला उधान आले होते. मात्र, रात्री ८.३० च्या दरम्यान पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी आपला कार्यभार साहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास गौते यांना सोपवून पोलीस स्टेशनमधून निघून गेल्याने त्यांचे निलंबन झाल्याचे निश्चित झाले. याबाबत तिरोडा पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या चर्चेनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून गोंदिया येथे रूजू झालेल्या पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यांना आळा घालण्याच्या हेतूने सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना अवैध धंद्यांना निर्देश देवून ज्या अधिकारी, कर्मचाºयांच्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे सुरू असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्याची सुचना केल्या असतानाही तिरोडा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेले अनेक अवैध दारू, जुगार व सट्ट्यावर कार्यवाही करण्यात आली असलीतरी काही ठिकाणी अवैध दारू विक्री, जुगार, सट्टा व वेश्श्यावृत्तीचे अड्डे सुरूच असल्याचे दिसून आल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ही कार्यवाही केल्याची चर्चा असून अशाच प्रकारची कार्यवाही तिरोडा पोलीस स्टेशनच्या आणखी काही कर्मचाºयांवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून यामुळे तिरोडा पोलीस स्टेशनच्या कर्मचाºयांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून संपूर्ण तालुक्यात हा चर्चेचा विषय झाला आहे.