स्वच्छता कर्मचारी महिला स्वच्छता मोहिमेच्या ‘ दूत’! – संतोष नागपुरे

0
16

आमगाव,दि.03: आपला परिसर, प्रभाग व पर्यायाने शहर दररोज स्वच्छ ठेवणाऱ्या महिला कर्मचारी या स्वच्छता मोहिमेच्या ‘स्वच्छता दूत’ आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत अभियान साकारण्यासाठी त्या काम करीत आहेत. त्यांच्यामुळेच शहराचे आरोग्य व पर्यावरण चांगले राहात आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे .युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे अश्याच स्वच्छता दूतांचे आमगाव नगरपरिषद क्षेत्रातील स्वच्छता दूतांचे सन्मान कार्यक्रम नगरपरिषद सभागृहात आयोजित करण्यात आले, यावेळी अद्यक्ष स्थानी संतोष नागपुरे ,प्रमुख अतिथी म्हणून प्रमोद कटकवार , बबलू मिश्रा ,डूदेश्वर भुते उपसरपंच किकरिपार , सरपंच किशोर रहांगडाले, श्रीमती सुनीता भिमटे सरपंच शिवनी, श्रीमती भागरता दोनोडे सरपंच घाटटेमनी,श्री रोशनजी फरकुंडे उपसरपंच घाटटेमनी,छनूभाऊ शेंडे उपसरपंच मुंडीपार, श्रीमती अनिता आग्रे सरपंच ठाणा,श्रीमती निर्माला टेंभरे सरपंच टाकरी,योगेश शिवणकर, मारोती कोल्हावार ,नंदुजी कोरे, राहुल उजवणे,युवाशक्ती फाउंडेशनचे यशवंत मानकर ,रितेश अग्रवाल,राजीव फुडें ,श्रीमती ज्योतीताई खोटोले , निखिल कोसरकर ,हरिष खरकाटे,उपस्थित होते .यावेळी उपस्थितत मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता दूत यांना भेट वस्तू व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सन्मान करण्यात आले .तसेच खंजरी वादानातून समाज प्रबोधन करणाऱ्या महिला यांचे याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले .