२ ते १२ जानेवारीपर्यंत विदर्भ राज्य निर्माण यात्रा

0
9

भंडारा,दि.10ः-२0१९ च्या निवडणुकीआधी विदर्भद्या अन्यथा विदर्भातून चालते व्हा, असा इशारा देत विदर्भ राज्य आंदोलन समिती निवडणूक लढविणार असून संपूर्ण विदर्भभर २ ते १२ जानेवारीपर्यंत विदर्भ राज्य निर्माण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी विदर्भातील सर्व विदर्भवादी पक्ष, संघटना एकत्र आल्या असून विदर्भ निर्माण महामंचाची स्थापना करण्यात आली आहे.
मागील निवडणुकीत केंद्रात भाजपची सत्ता आली की स्वतंत्र विदर्भराज्याची निर्मितीचे आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र, सत्ता आल्यानंतर विदर्भात भाजपाचे ४४ आमदार निवडून आले तर महाराष्ट्रातसुद्धा भाजपची सरकार आली. वैदर्भीय जनतेने प्रतिसाद दिला असता त्यांच्याशी बेईमानी करण्यात आली. त्यामुळे विदर्भ विरोधी धोरणाचा निषेध करून आवाहन करण्यात आले की, येत्या २0१९ च्या निवडणुकी आधी विदर्भ द्या अन्यथा विदर्भातून चालते व्हा, खुच्र्या खाली करा, यासाठी जनजागरणासाठी दि. २ ते १२ जानेवारीपर्यंत संपूर्ण विदर्भभर ‘विदर्भ राज्य निर्माण यात्रा’ विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे काढण्यात येणार आहे. २ जानेवारीला नागपूरातील सिताबर्डी येथील गांधी पुतळ्याला माल्यार्पण करून दुपारी १ वाजता छोटेखानी सभा घेऊन एक विदर्भनिर्माण यात्रा पूर्वविदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या सहा जिल्ह्यात फिरून १२ जानेवारीला नागपूरला परत येईल. यात्रेदरम्यान १00 लहान मोठय़ा सभा करून जनजागरण करण्यात येईल. विदर्भवाद्यांनी एकजुट होऊन ‘विदर्भनिर्माण महामंच’ तयार केला असून ‘संकल्प विदर्भ निर्मितीचा’ घोषवाक्य ठरविण्यात आले आहे. येत्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांना त्यांचा नाकर्तेपणाचा धडा शिकविण्यात येणार आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समिती भंडारातर्फे वेगळ्या विदर्भासाठी जिल्हा बैठकीचे आयोजन गुरूकृपा कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष देविदास लांजेवार तसेच प्रमुख अतिथी म्हणून मुख्य विदर्भ राज्य संयोजक राम नेवले, अरविंद लांजेवार उपस्थित होते.महामानवाला अभिवादन
भंडारा :सिल्ली येथील मिनीदिक्षाभूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६२ व्या महापरिनिर्वाण दिनाचे आयोजन बौद्ध विहार समिती सिल्लीच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी महामानवाला अभिवादन करण्यात आले. प्रमुख पाहूणे म्हणून ग्रा.पं. सदस्य लोकेश मेर्शाम, भगवान सुखदेवे, विवेक गजभिये, किशोर हुमणे, रविकांत गजभिये, प्रकाश हुमणे, अंबादास गजभिये, नाकसेन हुमने तसेच बौद्ध विहार समितीचे सर्व पदाधिकारी व बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते.