अटल जयंती निमित्त अटल मॅरेथॉन वेबसाईट आणि अँप चे लोकार्पण

0
14

#दि 25 ला मूर्री ते कालेखाँ चौक दरम्यान मॅरेथॉन

गोंदिया,दि.13ः- माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री चषक अंतर्गत भारतीय जनता युवामोर्चा तर्फे अटल मॅरेथॉन दि. 25 डिसेंबर 2018 ला सकाळी 6 वाजता मूर्री रोड ते कालेखाँ चौक दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे. एकूण 11 किमी चे अंतर असून प्रथम पुरस्कार 21,000, द्वितीय पुरस्कार 11,000, तृतीय , पुरस्कार 7,000, चतुर्थ पुरस्कार 5,000 आणि 5 ते 10 क्रमांक पटकावणाऱ्या प्रत्येक विजेत्याला 1,100 रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या साठी ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार असून त्यांच्या वेबसाईट आणि अँड्रॉइड अँप चे लोकार्पण भारतीय जनता पार्टी गोंदिया जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या हस्ते करण्यात आले. निशुल्क ऑनलाईन नोंदणी दि. 20 डिसेंबर 2018 सायंकाळी 6 वाजे पर्यंत www.bjymgondia.in किंवा अँड्रॉइड अँप BJYM Gondia डाऊनलोड करून करता येणार आहे अशी माहिती भारतीय जनता युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी दिली.

यावेळी गोंदिया जिल्हा संघटन मंत्री विरेंद्र अंजनकर, पूर्व जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, नगराध्यक्ष अशोक इंगळे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, न. प. उपाध्यक्ष शिव शर्मा, गटनेते घनश्याम पानतवने, सभापती दीपक बोबडे, बंटी पंचबुद्धे (संयोजक अटल मॅरेथॉन), अमृत जी इंगळे, नगरसेवक दिलीप गोपलानी, महामंत्री भाजयुमो ऋषिकांत साहू, महामंत्री भाजयुमो अभय मानकर, हंशु वासनिक, रोहित अग्रवाल (मुख्यमंत्री चषक जिल्हा संयोजक), नगरसेवक विवेक मिश्रा, अमित बिरीया, सतीश मेश्राम, राजेश बघेल आणि अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.