25.1 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ ‘सैराट’चे परश्या व आर्ची उद्या सडक अर्जुनीत

‘सैराट’चे परश्या व आर्ची उद्या सडक अर्जुनीत

0
34

सडक अर्जुनी,दि.16ः-महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या सिनेरसिकांच्या मनावर आपल्या अभिनयाने राज करणारे सैराट चित्रपटामधील परश्या व आर्ची अर्थात या चित्रपटातील मुख्य कलावंत आकाश ठोसर व रिंकू राजगूरू हे सिएम चषकाच्या माध्यमातून सोमवारी १७ डिसेंबर रोजी सडक अर्जुनी येथील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
युवकांमध्ये खेळभावना निर्माण व्हावी, खेळात युवकांना भवितव्य धडवता यावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात सीएम चषक क्रिडा स्पर्धा घेण्यात येते आहे. अशात सडक अजुर्नी येथेही या स्पधेर्चे आयोजन करण्यात आले होते. यानिमीत्ताने स्पर्धेचे बक्षीस वितरणाचे कार्यक्रम तेथील पंचायत समिती समोरील पटांगणावर सोमवारी सायंकाळी आयोजित करण्यात आले असून राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते हे बक्षिस वितरण पार पडणार आहे. यावेळी कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून सैराट चित्रपटातील परश्या व आचीर्ची प्रमुख भूमीका साकारणारे आकाश ठोसर व रिंकू राजगूरू उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या समारंभात नागरिकांनी जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आला आहे.

blank