जनतेकरिता आरोग्यसोयी उपलब्ध करणे माझे कर्तव्य -आ. रहांगडाले

0
8

तिरोडा,दि.25ः-आजच्या काळात प्रत्येक कुटुंबात एखाद्या आजार राहतो. शहर असो की ग्रामीण भाग अनेक रोग उद्भवलेले असून मलेरिया, डेंगू, शुगर, हृदयविकार अश्या अनेक प्रकारच्या रोगाने जनता त्रस्त आहे. जनतेला स्वच्छ व सुंदर ठेवणे हे माझे ध्येय आहे. सर्वसामान्य जनतेला चांगले आरोग्य प्रदान करून सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हेच माझे कर्तव्य असल्याचे मनोगत तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी केले.
ते तिरोडा येथे आमदार विजय रहांगडाले यांच्यातर्फे आयोजित आरोग्य महाशिबिराच्या उद््घाटनाप्रसंगी बोलत होते. या आरोग्य महाशिबिराच्या उद्घाटक म्हणून जिल्हा अधिष्ठाता डॉ. विनायक रूखमोडे, अध्यक्षस्थानी पोलिस अधीक्षक हरिष बैजल होते. तर प्रामुख पाहुणे म्हणूण गोंदिया येथील सेंट्रल हॉस्पीटलचे डॉ. एल.एल. बजाज, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शाम निमगडे, डॉ. मनोज राऊत, डॉ. पराडकर, कृउबास तिरोडाचे सभापति डॉ. चिंतामण रहांगडाले, उपसभापति विजय डिंकवार, सुनिल पालांदुरकर, मजूर सहकारी संस्था सचिव उमाकांत हारोडे, भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, मा. उपाध्यक्ष मदन पटले, तालुका अधीक्षक डॉ. हिम्मत मेर्शाम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शितल मोहने उपस्थित होते. यामध्ये शल्य चिकित्सा, अस्थिरोग तपासणी, नेत्र तपासणी, दंतरोग तपासणी, कान-नाक, घसा, स्त्री रोग, बाल रोग, चर्मरोग, मानसिक आरोग्य , हृदयरोग, रक्त तपासणी, क्षयरोग, मलेरिया आदी रोगांवर नि:शुल्क तपासणी करून मोफत औषधीचे वाटप करण्यात आले. या शिबिराच्या पहिल्या दिवशी प्रामुख्याने ग्रामीण व शहरी भागातील जवळपास ३ हजार ५00 रूग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिर २५ डिसेंबर रोजी सुद्धा सुरू राहणार आहे. शिबिरात रूग्णांची तपासणीकरिता डॉ. सीमा यादव, डॉ. भुमकर, डॉ. देशमुख, डॉ. जायस्वाल, डॉ. वेदप्रकाश चौरागडे, डॉ. प्रशांत तुरकर, डॉ. गार्गी बहेकार, डॉ. राहुल ब्राम्हणकर, डॉ. चौरसिया, डॉ. येळे, डॉ. अनिल पारधी, डॉ. अनमोल धुर्वे, डॉ. संदिप मेर्शाम, डॉ. अविनाश जायस्वाल, डॉ. कोठीकर व सर्व आशा सेविका आदी उपस्थित होते.