बावनकुळेंच्या जनता दरबारात युवकांनी विचारले ओबीसींचे प्रश्न

0
10

नागपूर,दि.२५ः- राज्याचे ऊर्जा मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चद्रंशेखर बावनकुळे यांच्या मौदा येथील आयोजित जनता दरबारात ओबीसी विद्यार्थी व युवकांनी ओबीसींच्या प्रश्नावर विचारणा करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.मात्र ओबीसींचे विचारलेल्या प्रश्नावर मंत्रीमहोदय समाधानकारक उत्तर न देऊ शकल्याने ओबीसी मंत्र्याचेही ओबीसीप्रती असलेला जिव्हाळा उघडकीस आला.विशेष म्हणजे या जनता दरबारात  ओबीसी विद्यार्थी  राम वाडीभस्मे यांने ओबीसी-मराठा अरक्षणासंबंधित प्रश्न विचारुन माहिती मागितली.मात्र मंत्री महोदयाने समाधानकारक उत्तर न देता सामाजिक न्यायमंत्री यांच्याशी बैठक लावण्याचे आश्वासन देत वेळ मारुन नेली.या दरबारात राज्य सरकारने मराठा या एका समाजाला १६% आरक्षणाचा कायदा केला.मग ओबीसी प्रवर्गात ३५० जाती आहेत त्याना केवळ १९% तर आदिवासी बहुल जिल्ह्यात ओबीसीस ०% आरक्षण आहे.हे आरक्षण वाढविण्यासाठी सरकार कुठले पाऊल उचलणार आहे.मराठा समाजाला एसईबीसी नावाने आरक्षण दिले.तर ओबीसीचा संवैधानिक वर्गही एसईबीसी आहे. हा घोळ कोर्टात सरकार कसा स्पष्ट करणार?,ओबीसी आरक्षण विरोधात एका मराठा व्यक्तिने न्यायालयात दावा केला आहे.त्यावर ओबीसी आरक्षण समर्थनात सरकारने बाजू मांडण्यासाठी काय पाऊल उचलले आहे.३५० जातीच्या ओबीसी + एनटी,व्हीजे,एसबीसीसाठी केवळ १० संख्येचा परदेशी उच्च शिक्षणासाठी जीआर काढला,परंतु अर्ज भरण्याची ऑनलाईन प्रक्रीया केली नाही याचा खुलासा करण्यात यावा.ओबीसींसाठी केंद्रसरकारची होस्टेल योजना आहे.पण राज्यात एकही होस्टेल कां नाही तर शिष्यवृत्ती,फी सवलत योजनेचे पैसे ओबीसी विद्याथ्र्यांना मिळत नाही,त्यांनी काय करावे असे प्रश्न बावनकुळे यांना विचारण्यात आले होते.परंतु एकाही प्रश्नावर त्यांनी उत्तर देण्याचेच टाळल्याने सरकार व मंत्री फक्त मताच्या राजकारणासाठीच ओबीसींचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे.यावेळी राम वाडीभष्मे, शुभम वाघमारे, शुभम आखरे, पालाश मेहर, आदाम खान, सौरभ आखरे, आशिष जगनाडे व आदी ओबीसी बांधव उपस्थित होते.