सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, मशीद धार्मिक स्थळ नाही, कधीही तोडता येऊ शकते

0
14

गुवाहाटी – भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. स्वामी यांच्या मते मशीद म्हणजे धार्मिक स्थळ नसते, त्यामुळे ते कधीही तोडता येऊ शकते. मशीद म्हणजे इतर सामान्य इमारतींसारखी असते असेही स्वामी म्हणाले. स्वामी यांच्या या वक्तव्याचा आसाममध्ये चांगलाच विरोध झाला. तसेच त्यांच्या विरोधात गुन्हा देखिल दाखल झाला.

स्वामी यांनी त्यांच्या वक्तव्यासाठी सौदी अरबचे एक उदाहरणही दिले. त्याठिकाणी रस्ता तयार करण्यासाठी मशीद जमिनोदोस्त करण्यात आली होती. ते म्हणाले, कोणी माझ्या या मुद्याशी असहमत असेल, तर मी त्याच्याशी या मुद्यावर चर्चा करायलाही तयार आहे. मला सौदी अरबमधील काही लोकांनीच ही माहिती दिली आहे. सर्व मुस्लीम पूर्वी हिंदु होते, असा दावाही स्वामी यांनी केला.

या वक्तव्याचा विरोध करत अनेक संघटनांनी भाजप नेते स्वामी यांचे पुतळे जाळले आहेत. आसाम वक्फ बोर्ड, ऑल अासाम मायनॉरिटी स्टुडंट युनियन आणि इतर मुस्लिम संघटनांनी स्वामी यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. तसेच एखा संस्थेने स्वामी यांच्या विरोधात तक्रारही दाखल केली आहे. संस्थेचे अध्यक्ष अखिल गोगोई म्हणाले की, विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यात धार्मिक तणाव निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यांनी स्वामी यांच्या आसाम प्रवेशावर बंदी घालण्याची मागणीही केली आहे.

असामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनीही सुब्रमण्यन स्वामी आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपला आसामच्या नागरिकांच्या भावनांशी खेळण्याची किंमत चुकवावी लागेल, असे गोगोई म्हणाले. दरम्यान, या वक्तव्याचे गांभीर्य पाहता भाजपच्या राज्य कार्यकारिणीने या वक्तव्यातून अंग काढून घेतले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भट्टाचार्य म्हणाले की, हे स्वामी वैयक्तिक मत आहे पक्षाचे नव्हे. या प्रकरणी पक्षातील वरिष्ठांना कळवणार असल्याचेही ते म्हणाले.