वाघाच्या हल्यात ब्रम्हपुरी तालुक्यात इसमाचा मृत्यू

0
9

ब्रम्हपुरी,दि.12ः- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यांतर्गत येत असलेल्या हळदा येथील एका इसमावर गावाजवळील  कालव्याला लागून असलेल्या जंगलशेजारील शेतात गुरे चरायला गेला असतांना शेतात शौचालयास बसला असता नरभक्षक वाघांने हला करून 200 मीटर ओढत नेऊन लचके तोडून जीव घेतल्याची घटना आज(दि.12)सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली.. त्यावेळी त्यासोबत असलेल्या दोन गुराख्यांनी ओरडाओरड केली पण आक्रमक वाघांनी त्याला सोडले नाही.त्यामुळे गावपरिसरात वाघांची दहशत निर्माण झाली आहे. सदर मृत इसमाचे नाव दिवाकर बाबुराव गेडाम (वय45) असे आहे.सततच्या हल्यामुळे नागरिक भयभीत झाले असून वनविभागाप्रती नागरिकांत रोष निर्माण झालेला आहे.घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोचले.

वनविभागाबदद्ल आक्रोश बघत वनविभागाच्या सहा.उपवनसरंक्षक अधिकारी श्रीमती बोनगळे यांनी मृताच्या कुटुंबातील सदस्याला घटनास्थळी रोख 20 हजार रु.रोख  देत मृतदेहाच्या उत्तरीय तपासणी दरम्यान रुग्णालयात  2 लाख 80 रु.देण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी शांत होत मृतदेह ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले.