वर्षा पटेल यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन

0
12

गोंदिया,दि.13 :राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर कुडवा येथील वॉर्ड क्रमांक ६ राधाकृष्ण कॉलनीत ९ लाख रुपयांच्या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेंद्र जैन तर प्रमुख पाहुणे म्हणून विनोद हरिणखेडे, बाळकृष्ण पटले, जि.प. सदस्या खुशबू टेंभरे, पं.स. सदस्या किर्ती पटले, जितेश टेंभरे, उमेश खोब्रागडे, योगिता भालाधरे, पन्नालाल डहारे, माधुरी तुरकर, विनोद तिघारे, एन. एफ. रहांगडाले, गुड्डू मिर्शा, राजेश शहारे, पूरनसिंग बघेले, रमेश भुते, यू.सी रहांगडाले व अन्य उपस्थित होते. यावेळी महिला व पुरुषांनी वर्षा पटेल यांची भेट घेऊन चर्चा केली. कार्यक्रमाचे संचालन वाय. एन. कापगते यांनी केले. आभार सी.एच. रहांगडाले यांनी मानले.