सकारात्मक पत्रकारितेतून सामान्यांना न्याय मिळतोच : राठोड

0
7

आमगाव,दि.14 : योजनांना घरोघरी पोहोचविण्याचे कार्य शक्य झाले. पत्रकार शासन व जनतेचा दुवा आहे. सत्यता बाळगून गरीब गरजूंना न्याय मिळवून द्यावा, शासकीय योजना घराघरात पोहोचविण्याचे कार्य पत्रकारांमुळे शक्य झाले आहे. प्रिंट मीडियाचे महत्त्व आजही अमर आहे, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांनी केले.ते आमगाव तालुका पत्रकार संघाने आयोजित श्रद्धेय लक्ष्मणराव मानकर इ्स्टिटट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज येथील पत्रकार दिवसानिमित्त कार्यशाळेत बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी जगदीश शर्मा, उद्घाटक म्हणून एच.एच. पारधी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड, नायब तहसीलदार शिशुपाल पवार, प्राचार्य डॉ. डि.के. संधी, तालुका कृषी अधिकारी लाखन बन्सोड, कविता रहांगडाले, इसुलाल भालेकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वन करून बालशास्त्री जांभेकर व लक्ष्मणराव मानकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले. पारधी यांनी, पत्रकार समाजाचा आरसा आहे, आज आणि काल यातील पत्रकारितेत आव्हाने समोर येत आहेत. अशा परिस्थितीत सत्याची खंजर उचलून शोषितांना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करावे, ग्रामीण पत्रकार परिसरातील समस्या मंत्रालयात पोहोचविण्याचे कार्य करतो. वेळोवेळी शासन योजना गोरगरिबांना मिळाल्या की, नाही याचा पाठपुरावा करतो म्हणून पत्रकार व प्रशासनाचे बंधुभावाचे संबंध आहेत, असे शिशुपाल पवार यांनी सांगितले. .

कार्यक्रमाचे संचालन प्रा. झेड.एस. बोरकर यांनी केले तर आभार राजीव फुंडे यांनी मानले. यशस्वितेसाठी सुनील क्षीरसागर, सुनील पडोले, यशवंत मानकर, आनंद शर्मा, विकास शर्मा, पालकराम वालदे, रितेश अग्रवाल, नरेंद्र कावळे, महेश मेश्राम, दिनेश शेंडे, अजय खेतान, रेखलाल टेंभरे, प्रा.डी.एस. टेंभुर्णे, मुरलीधर करंडे, संतोष कटकवार, तुलाराम कावळे, रिनाईत, डॉ. लांजेवार, प्रा. कथलेवार, मोहनलाल नेवारे, संतोष गुप्ता, रंजित मेश्राम, गोलू अग्रवाल आदींनी परिश्रम घेतले. .