‘एक शाम राष्ट्र के नाम’ कविसंमेलन उत्साहात

0
15

गोंदिया,दि.30ः- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कन्हारटोली येथील पोवार बोर्डिंग येथे २५ जानेवारी रोजी ‘एक शाम राष्ट्र के नाम’ अखिल भारतीय कवी संमेलनाचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले होते.संमेलनाचे उद््घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या हस्ते  दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने  माजी खासदार खुशाल बोपचे, माजी आ. खोमेश्‍वर रहांगडाले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनोद अग्रवाल, माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे, जिप सभापती शैलजा सोनवाने, भाऊराव उके, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, शहर अध्यक्ष सुनिल केलनका, नंदकुमार बिसेन, भरत क्षत्रीय, बंटी पंचबुध्दे,घनश्याम पानतवने जयंत शुक्ला तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या कवि संमेलनात मुंबईचे कवी सागर त्रिपाठी, अमरावतीचे हास्यव्यंगकार किरण जोशी, लखनऊचे कमल आग्नेय, राजीमचे काशीपुरी कुंदन, जबलपूरच्या अर्चना अर्जन, वाराशिवनीचे अंतू झकास, तुमसरचे प्रमोद पारखी आदी कवि सहभागी झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी, साहित्यकार, कवी हा देशाचा आत्मा असून त्यांच्या लेखनीतून निघालेल्या ज्वालेतूनच स्वातंत्र्य क्रांतीची मशाल पेटली होती. आपल्या ओजस्वी वाणी व लेखनीतून ते नेहमीच देशाला मार्गदर्शन करतात. अशा साहित्यकार व कवींना नमन असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी करताना कविसंमेलनाचे हे व्दितीय वर्ष असून प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी कार्यक्रम आयोजनाची परंपरा कायम ठेवणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी शहरातील प्रसिध्द कवी रमेश शर्मा यांनी सर्व कवींचा परिचय करुन दिला. कवियत्री अर्चना अर्जन यांनी सरस्वती वंदनेतून कार्यक्रमाला सुरवात केली. तद्नंतर कवी प्रमोद पारखी यांनी शहीद जवान याविषयावर कविता सादर केली. तर अंतू झकास यांनी आपल्या ‘बेटी’ या विषयावर कविता सादर करुन र्शोत्यांची मने जिंकली. काशीपुरी कुंदन यांनी दैनंदिन जीवनात होत असलेल्या समाजातील विदारक स्थितीवर व्यंगात्मक कविता सादर केल्या. तसेच हास्यव्यंगकार किरण जोशी यांनी उत्कृष्ट संचालन करुन आपल्या कविताच्या माध्यमातून र्शोत्यांची मने जिंकली. देशातील प्रसिध्द कवी सागर त्रिपाठी यांनी आपल्या गजल व शायरीने संमेलनात रंग भरला. त्यांची राधाकृष्ण व बांसुरीवर आधारीत कविता व मॉ याविषयावर आधारीत कवितेला र्शोत्यांची भरभरुन दाद मिळाली. तर कमल आग्नेय या युवा कवीने अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर सादर केलेली कविता तसेच आजच्या विरोधकांच्या राजकीय परिस्थितीवर वार करीत युवकांमध्ये उत्साह निर्माण केला. या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने पक्ष कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. आयोजनासाठी भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, जिल्हा महामंत्री ¬षीकांत शाहू, ललित मानकर, अभय मानकर, रोहित अग्रवाल, अनुराग शुक्ला, बंटी शर्मा तसेच सर्व भाजयुमो पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.