30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ मूल येथे शासकीय कृषी महाविद्यालय

मूल येथे शासकीय कृषी महाविद्यालय

0
41

चंद्रपूर,दि.30ः- जिल्हय़ातील मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या मंगळवारला झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जुलै २0१८ च्या नागपूर येथे झालेल्या पावसाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी घोषित करण्यात आलेल्या विशेष पॅकेजमध्ये राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्र्यांनी यासंबंधिची घोषणा केली होती.
जिल्हय़ातील नागरिकांच्या उपजीविकेचे साधन प्रामुख्याने जंगल व शेतीवर आधारित आहे. सदर जिल्हय़ातील नागरिकांची कृषी शिक्षण घेण्याची मानसिकता असून, सुध्दा सदर जिल्हा मागास असल्यामुळे या जिल्हय़ांमध्ये युवक व युवतींसाठी कृषी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. ज्यामुळे आधुनिक कृषीतंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी ग्राम पातळीवर विस्तार कार्यकर्ते, ग्रामसेवक, कृषीमित्र व तज्ज्ञ मार्गदर्शक निर्माण होवू शकतील. या क्षेत्राची ही विशिष्ट गरज लक्षात घेता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव विद्यापीठामार्फत शासनाला सादर करण्यात आलेला आहे. या प्रस्तावाला आज मंत्रीमंडळाची मान्यता मिळाली आहे.
मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन झाल्यास जिल्हय़ातील युवक युवतींसाठी कृषी पदवीधर अभ्यासक्रमाची सुविधा निर्माण होणार असून, त्या माध्यमातून बदलत्या हवामानानुसार कृषी व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय व शेती उद्योग ज्या मुळे कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार या भागात होवू शकतो. तसेच शेतकर्‍यांना आधुनिक पध्दतीने शेती कशी करावी, यासंबंधीचे प्रशिक्षण व सल्ला देऊन पिकांची उत्पादकता वाढून पयार्याने त्यांचा आर्थिकस्तर उंचावेल. ही गरज लक्षात घेता हे महाविद्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रांतर्गत विदर्भातील ११जिल्हय़ांचा समावेश होतो. सद्य:स्थितीत पूर्व विदर्भातील ५ जिल्हय़ांसाठी केवळ दोनच घटक कृषी महाविद्यालये कार्यरत असून, पूर्व विदर्भातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सदर शासकीय कृषी महाविद्यालय सहाय्यभूत ठरणार आहे.
मुल लगतच्या मारोडा, सोमनाथ येथे विद्यापीठाच्या मालकीची ६१.८0 हे. जमीन उपलब्ध आहे. यापैकी ४१.८0 हेक्टर जमीन या कृषी महाविद्यालयासाठी उपलब्ध होवू शकते. या कृषी महाविद्यालयासाठी शेती प्रयोगासाठी आवश्यक ३0 हेक्टरजमीनीची निकड उपलब्ध जमिनीतून भागविली जावू शकते.
झुडपी जंगल कृषी शाखेच्या विद्याथ्यार्ंना पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीकोणातून अभ्यासासाठी उपयुक्त ठरू शकते. या सर्वबाबी लक्षात घेता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत मुल येथे ६0 विद्यार्थी प्रतिवर्ष प्रवेश क्षमतेचे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला आहे.