फसवणूक करणाऱ्या भाजपाला धडा शिकवा-खासदार पटेल

0
23

मोहाडी,दि.30 : अजूनही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. धानाला योग्य भाव नाही. तुडतुडयाच्या लाभासाठी अजूनही शेतकरी चकरा मारत आहेत. पंधरा लक्ष रुपये बँकेत आले नाही. अच्छे दिन भाजपाचे आले. बेरोजगारांचे हात रिकामेच आहेत. बेरोजगार व शेतकऱ्यांना फसविणाऱ्या भाजपाला धडा शिकविण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.
हरदोली/झंझाड येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. उपस्थित शेतकरी, बेरोजगार युवकांना मार्गदर्शन करताना खासदार पटेल बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी किसान सभेचे नेते माधवराव बांते होते.
मंचावर खासदार मधुकर कुकडे, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुधे, माजी आमदार अनिल बावनकर, राष्ट्रवादी पक्षाचे उपाध्यक्ष राजू कारेमोरे, रामलाल चौधरी, डॉ. पंकज कारेमोरे, विठ्ठल कहालकर, राजू माटे, श्रीकृष्ण पडोळे, आशिष पात्रे, हरिभाऊ डोये, किरण अतकरी, धनंजय दलाल, विजय पारधी यासह निता झंझाड, प्रदीप बुराडे, शाम कांबळे, प्रभाकर उपरकर, सुरेश घरजारे, भगतसिंह दमाहे, रिता हलमारे, मंसाराम बुधे, त्रीशुला दमाहे, विनोद वैद्य, तुलाराम हारगुळे, सवीता बाहे, मार्तंड झंझाड, राधेशाम गाढवे, ईसन जीभकाटे, राजू उपकर, रविंद्र झंझाड, ईश्वर माटे, छगन बिल्लोरे, कमलेश कनोजे, ज्योती झंझाड, हिरा झंझाड, सुझान झंझाड, संगीता झंझाड यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रफुल्ल पटेल यांचे हस्ते दुर्गा मंदिरात कलश पूजन व इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. जाहिरातबाज व मृगजळात फरवणारी ही भाजपाची मंडळी आमचेच खरे असल्याचे भासविले. शेतकºयांना कर्जमाफीच्या रांगेत लावून त्यांच्या अपमान करणाऱ्या भाजपाला आता घरची रस्ता दाखवा असे आवाहन खासदार मधुकर कुकडे यांनी केले. अध्यक्षस्थानावरुन किसान सभेचे नेते माधवराव बांते यांनी, शेतकºयांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. पेंचच्या पाण्याचे राजकारण केले गेले. भाजपाच्या अडवणूक धोरणामुळे शेवटच्या टोकापर्यंत पेंचचे पाणी आले नाही. त्यामुळे शेतकºयांचे धानाचे उभे पिक करपले.
यावेळी सुनिल फुंडे, विठ्ठल कहालकर, अनिल बावनकर, राजू माटे आदींची मेळाव्यात भाषणे झाली. वृध्द कलावंत शामराव झंझाड, गंगाधर तांदुळकर, पुरुषोत्तम झंझाड यांचा शाल, श्रीफळ देवून खासदार प्रफुल्ल पटेलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक सरपंच सदाशिव ढेंगे यांनी केले. संचालन हटवार, पारधी यांनी तर आभार पोलीस पाटील पंढरी झंझाड यांनी केले. मेळाव्यासाठी रामू पवनकर, उपसरपंच मनोज झंझाड, राजेश बुरडे, लक्ष्मीकांत सार्वे, प्रकाश बांते, विलास झंझाड, राजू कुर्वेकर, स्वप्नील माटे, मंगल झंझाड, नितेश तांदुळकर, रमेश बांते, अंजना कुर्वेकर, ललिता शेंडे, विजया सार्वे, हिरामन झंझाड आदींनी सहकार्य केले.