41.3 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ कठाणी नदीपुलावरून आॅटो नदीत कोसळला ; ८ प्रवासी जखमी

कठाणी नदीपुलावरून आॅटो नदीत कोसळला ; ८ प्रवासी जखमी

0
34

blank

गडचिरोली,दि.३१ –गडचिरोली -आरमोरी मार्गावर असलेल्या शहरापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावरील कठाणी नदीच्या जुन्या पुलावरून प्रवासी आटो नदीत कोसल्याची घटना आज (दि.३१) सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत आठ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तालुक्यातील काटली येथील काही भाजी विक्रेते व नागरिक आ्टोने गडचिरोलीकडे येण्यासाठी निघाले होते. दरम्यान कठाणी नदीवरील जुन्या पुलावर आॅटोचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने आॅटो पुलाच्या दुसºया बाजुने नदीत कोसळला. त्यामुळे आॅटोमधील आठ प्रवासी गंभीर जखमी झाले तर आॅटो पूर्णत: क्षतीग्रस्त झाला. घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस घटनास्थळी पोहोचले. कठाणी नदीवर नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र अद्याप या पुलाचे उद्घाटन झालेले नाही. त्यामुळे जुन्याच पुलावरून सध्या वाहतूक सुरू आहे.