23.8 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ सेजगाव येथे रस्ता बांधकाम व हायमास्ट लाईटचे भूमिपूजन

सेजगाव येथे रस्ता बांधकाम व हायमास्ट लाईटचे भूमिपूजन

0
36
गोंदिया/एकोडी,दि.0४ : जवळील सेजगाव येथे मुलभूत सुविधा अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम व हायमास्ट लाईट बांधकामाचे भूमिपूजन तसेच नवनिर्मित सभामंडपाचे लोकार्पण सोहळा ३ फेब्रुवारी रोजी आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सरपंच कंठीलाल पारधी, पं.स.सदस्य डॉ. किशोर पारधी, उपसरपंच स्वप्नील महाजन, प्रामुख्याने उपस्थित होते.
सेजगाव येथे सिमेंट रस्ता बांधकाम व्हावे, अशी मागणी ग्रामस्थानी ग्रामपंचायतीकडे केली होती. ग्राम पंचायतचे सरपंच व सदस्यांनी गावातील विविध समस्यांना घेऊन आमदाराकडे मागणीचे निवेदन सादर केले. त्या आधारावर आ. रहांगडाले यांनी २५-१५ मुलभूत सुविधांतर्गत सिमेंट रस्ता व हायमास्ट लाईट दिले तसेच त्याचे भूमिपूजन ही केले. तसेच हनुमान मंदिर जवळील सभामंडपाचे लोकार्पणही केले. या कार्यक्रमाला ग्रा.पं.सदस्य विजय गठलकर, सौ. मनिषा बावणकर, शिवसेनेचे सुनिल पांलांदुरकर, सौ.शारदा सिंहमारे, सेवानिवृत्ती कर्मचारी सूरजलाल पारधी, गौरीशंकर पारधी, चंद्रकुमार बिसेन, राजेंद्र गठलकार, मनोज कटरे, युसुफ शेख, प्रवीण करंडे, भूवन पारधी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
blank