ओबीसींच्या मागण्यांचे जिल्हाधिकारी व समाजकल्याण आयुक्तांना विद्यार्थी महासंघाचे निवेदन

0
21

चंद्रपूर,दि.06ः-भारत सरकार शिष्यवृत्ती ओबीसी विद्यार्थ्यांना100% लागू करण्यात यावे यासह इतर मागण्यांना घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघ विद्यार्थी शाखा आणि युवक शाखेतर्फे अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण चंद्रपूर यांना राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे समन्वयक प्राचार्य डॉ.अशोकभाऊ जीवतोडे,महासचिव सचिन राजूरकर यांच्या मार्गदर्शनात ओबीसी महासंघ जिल्हाध्यक्ष निकिलेश चामरे,संघटक जीवन गाडगे,राजेश सोयाम,उमंग हिवरे,शुभम पवार,तृप्तेश मासिरकर,रोशन पाचभाई या विद्यार्थ्यांनी निवेदन दिले.
निवेदनात ओबीसी समाजाची जनगणना होत नसल्याने आरक्षणाचा लाभ मिळत नाही.त्यामुळे सामाजिक शैक्षणिक स्थिती कमकुवत होत असल्याने सर्वात आधी जनगणना करण्यात यावी.ओबीसी विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती लवकर जमा करण्यात यावी. ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करण्यात यावी.वसतिगृहाची बजेटमध्ये तरतूद करून बांधकाम करण्यात यावे.सामाजिक न्याय विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा,यूपीएससी प्रशिक्षण,स्किल डेवलफमेन्ट प्रशिक्षण,पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण,मोटार ड्राइविंग प्रशिक्षण देण्यात यावे.एस सी एस टी वर्गातील मुला मुलींना सर्व स्पर्धा परीक्षा शुल्कामध्ये सवलत दिली जाते.त्याचप्रमाणे ओबीसी मुला मुलींना सर्व स्पर्धा परीक्षा शुल्क मध्ये सवलत देण्यात यावी.ओबीसी शेतकऱ्यांना अनुसूचित जाती जमातीप्रमाणे योजनेचा लाभ देण्यात यावा.चंद्रपूर जिल्ह्यात एकही टक्का मराठा समाज नसताना 16% जागा आरक्षित केल्या आहेत.त्यातुलनेत ओबीसी समाजाला केवळ 11%जागा आरक्षित आहेत त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे आरक्षण पूर्ववत करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता.